Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘ओपन मॅरेज’चा वाढतोय ट्रेंड; कपल्सकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

‘ओपन मॅरेज’चा वाढतोय ट्रेंड; कपल्सकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

आपल्या भारतात अनेक विधींना विशेष असे महत्त्व आहे. त्यात विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन.. हिंदू धर्मानुसार विवाह एक संस्कार आहे, जे रितीरिवाजाप्रमाणे केले जाते. यात दोन्ही जोडीदार देव-ब्राम्हणांच्या साक्षीने, तसेच आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहाचा सोहळा पार पडतो. ज्यानंतर दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतात. ज्यात विवाहबाह्य संबंध हे गैर मानले जाते. मात्र, बदलत्या काळानुसार याचे स्वरुपही बदलत चालले आहे.

आजच्या काळात ओपन मॅरेजचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. पूर्वी हा ट्रेंड उच्च समाज किंवा अतिश्रीमंत लोकांपुरता मर्यादित होता, परंतु आजकाल मध्यमवर्गीय लोक देखील याचा अवलंब करत आहेत. ओपन मॅरेज म्हणजे जेव्हा दोन विवाहित जोडीदार एकमेकांच्या विवाहबाह्य संबंधांना सहमती देतात. ओपन मॅरेजमध्ये लग्नानंतरही एखाद्याचे अफेअर असेल तर ती फसवणूक मानली जाणार नाही. ओपन मॅरेजमध्ये परस्पर समंजसपणा असतो. यात, कोणत्याही जोडीदाराला विवाहबाह्य संबंधांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सोप्या भाषेत समजल्यास नवरा लग्नानंतर गर्लफ्रेंड बनवू शकतो, तर पत्नीलाही लग्नानंतर बॉयफ्रेंड बनवता येते.

कपल्सला ओपन मॅरेजमुळे अनेकदा स्वातंत्र्य मिळते, तर काही लोक मानतात की ओपन मॅरेज प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. हे दर्शविते की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खोटे बोलत नाही किवा त्यांची फसवणूक करत नाही. ओपन मॅरेज हे पूर्णपणे जोडप्यांवर अवलंबून असते, कारण त्यामुळे नाते अधिक मजबूत आणि कमकुवत होऊ शकते. ओपन मॅरेजचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!