आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंब असतात. काही लोक आपल्या आहाराकडे लक्ष देतात, तर काहीजण आपली शारीरिक हालचाल वाढवतात. बऱ्याच लोकांना हे अवघड वाटते, त्यामुळे ते वजन कमी करण्याच्या औषधांचा आधार घेतात. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे आणि वजन कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.
नवीन संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, आपल्या शरीरातील फॅट्सच्या पेशी केवळ ऊर्जा साठवत नाहीत, तर ती फॅट्स बर्न करून उष्णता देखील निर्माण करतात, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. आपल्या शरीरात प्रामुख्याने दोन प्रकारचे फॅट्स असतात. पांढरे फॅट्स आणि तपकिरील फॅट्स असते. पांढरी फॅट्स पोटात आणि मांड्यांमध्ये जमा होते आणि ती कमी करण्याचा लोक प्रयत्न करतात. तर, तपकिरी फॅट्स ‘जैविक हीटर’ म्हणून काम करते.
जैविक हीटर तिचे कार्य कॅलरी साठवणे नाही, तर कॅलरी बर्न करून ऊर्जा निर्माण करणे आहे. त्यात मायटोकॉन्ड्रिया नावाची मोठ्या संख्येने लहान ऊर्जा केंद्रे असतात, जी लोहाच्या प्रमाणामुळे तिच्या तपकिरी रंगासाठी जबाबदार असतात. तपकिरी फॅट्सचे मुख्य कार्य शरीराचे तापमान राखणे हे आहे. जेव्हा आपल्याला थंडी वाजते, तेव्हा तपकिरी फॅट्स सक्रिय होते आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी साखर (ग्लुकोज) व पांढरी चरबी जाळते. या प्रक्रियेमुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे अत्यंत थंडीतही शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर राहते.


