Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट! खासगी सचिवांची 4 तास चौकशी; घातपाताच्या संशयाने तपासाला वेग

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट! खासगी सचिवांची 4 तास चौकशी; घातपाताच्या संशयाने तपासाला वेग

Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली असून, अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खासगी सचिव अविनाश सोलवट यांची तब्बल ४ तास चौकशी केली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, २७ जानेवारीची रात्र आणि २८ जानेवारीच्या नियोजित दौऱ्याबाबत सीआयडीने अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारून माहिती गोळा केली आहे.

तपासाचा रोख: घातपात की तांत्रिक चूक?
सीआयडीच्या या चौकशीत प्रामुख्याने दौऱ्याच्या नियोजनावर भर देण्यात आला. बारामती दौऱ्याची आखणी नेमकी कोणी केली आणि ऐनवेळी कार्यक्रमात काही बदल झाले होते का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. तसेच २७ जानेवारीच्या रात्री पवारांच्या निवासस्थानी दौऱ्याबाबत नेमकी कोणाशी चर्चा झाली, याचीही माहिती घेण्यात आली. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी तांत्रिक तपासणीत काही त्रुटी होत्या का किंवा सुरक्षेत काही हलगर्जीपणा झाला होता का, या कोनातूनही सध्या तपास सुरू आहे.

खासदार बजरंग सोनवणेंचा ‘बॉम्बस्फोटा’चा संशय
या अपघाताला आता राजकीय वळण मिळाले असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. उपलब्ध व्हिडिओंचा दाखला देत त्यांनी हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. “विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत त्याचा स्फोट झाला, मग विमानात बॉम्ब होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोनवणे यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, या भीषण घटनेमागे एखादे मोठे षडयंत्र तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता
राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यामुळे सीआयडीवर निष्पक्ष तपास करून सत्य बाहेर काढण्याचे मोठे दडपण आहे. अविनाश सोलवट यांच्या चौकशीतून समोर येणारे धागेदोरे आणि तांत्रिक तपासाचे अहवाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी देऊ शकतात. घातपाताचा संशय खरा ठरल्यास हे प्रकरण राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे संशयास्पद मृत्यू प्रकरण ठरू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!