Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Voter Ink Controversy: शाई पुसून व्हिडीओ बनवाल तर खबरदार! दुबार मतदानाच्या अफवांवर निवडणूक आयोगाचा कडक इशारा

Voter Ink Controversy: शाई पुसून व्हिडीओ बनवाल तर खबरदार! दुबार मतदानाच्या अफवांवर निवडणूक आयोगाचा कडक इशारा

Voter Ink Controversy: मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनी राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, मुद्दाम शाई पुसून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शाई पुसली जात असल्याचा दावा करणारे व्हिडीओ बनवणे हे गैरकृत्य असून, असा खोडसाळ प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

मार्कर पेनचा वापर आणि लाईव्ह टेस्ट

निवडणूक आयोगाने या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, 2011 च्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शाई लावण्यासाठी ‘मार्कर पेन’चा वापर केला जातो. ही शाई नखावर आणि त्वचेवर 3-4 वेळा घासून लावण्याच्या कडक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शाईच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी आयोगाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या बोटावर शाई लावून ‘लाईव्ह टेस्ट’ (चाचणी) देखील केली. ही शाई सहज पुसली जात नसल्याचे या चाचणीत सिद्ध झाले असून, सोशल मीडियावर पसरणारे व्हिडीओ हे केवळ दिशाभूल करण्यासाठी असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा – Election Commission Voter Ink: ‘शाई पुसून पुन्हा मतदान अशक्य, कारण…’; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

दुबार मतदानावर बंदी आणि राजकीय टीकेला उत्तर

शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास तो गंभीर गुन्हा मानला जाईल आणि अशा ‘बोगस’ मतदारांवर तातडीने अटकेची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. शाई प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रशासनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, निवडणूक आयोग कोणाचीही बाजू घेत नाही. सर्व दोष यंत्रणेवर ढकलण्यापेक्षा मतदारांनी आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शक असून त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘पाडू’ (PADU) यंत्राबाबत तांत्रिक खुलासा

विरोधी पक्षांनी ‘पाडू’ यंत्राबाबत उपस्थित केलेल्या शंकांचेही आयोगाने निरसन केले आहे. आयोगाच्या मते, हे यंत्र २००४ पासून वापरात असून ते नवीन नाही. केवळ ईव्हीएम (EVM) चा डिस्प्ले बंद पडल्यास अपवादात्मक स्थितीतच याचा वापर केला जातो आणि आतापर्यंत केवळ ०.५ टक्के प्रकरणांतच याची गरज भासली आहे. लोकशाही प्रक्रियेत संशय निर्माण करणे चुकीचे आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींवर आम्ही तत्काळ कारवाई केली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे, असे दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!