Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मतचोरीनंतर आता जमीन चोरी! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मतचोरीनंतर आता जमीन चोरी! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

पुणे: मराठवाड्यातील चारदिवसीय दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही कोणतेही बटन दावा मत तर भाजपालाच जाणार.100 वर्षात मराठवाड्यावर असे कधीही संकट आले नाही. मतचोरीनंतर हे आता जमीन चोरी करत आहेत. आता जर कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? जमीन खरडून गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. आता सरकारला मतचोरीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, असा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी ठाकरे यांनी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणावर देखील कठोर मत व्यक्त केले. तसेच कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की, नाही? परदेशी समिती आली की नाही? केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. आता निवडणुका आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हाताला पाने पुसण्यासाठी कोणते तरी पॅकेज आणतील. पंतप्रधानांचे सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनीचं सांगितलं आहे.

हेही वाचा –‘चुकीला माफी नाही, पार्थ पवारावर गुन्हा दाखल झालाचं पाहिजे…’; महायुतीतील ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

तथापी, शक्तीपीठ महामार्ग, सिमेंट कारखाना व नियमबदल यासारख्या इतर प्रश्‍नांवरही ठाकरेने सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना संयमाचे आणि आत्महत्यांबाबत खबरदारीचा संदेश दिला. आर्थिक संकटानंतर आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच त्यांनी मतदानाबाबत आणि राजकीय दबावाबाबत देखील गंभीर इशारा दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!