Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar : ‘एखाद्या समुदायाबद्दल काय बोलतोस…; अजित पवारांनी संग्राम जगतापांना सुनावलं

Ajit Pawar : ‘एखाद्या समुदायाबद्दल काय बोलतोस…; अजित पवारांनी संग्राम जगतापांना सुनावलं

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मागील काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत मुस्लिम समुदायाविषयी वादग्रस्त वक्तव्ये करणारे आमदार संग्राम जगताप हेही या बैठकीस हजर होते. येथे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे त्यांना चांगलेच सुनावले असून, पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या विरोधात अशी वक्तव्ये करू नये, असा इशारा दिला.

बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यात सध्या सामाजिक पातळीवर अनेक घटना घडत आहेत. अशा वेळी सार्वजनिक जीवनात आपण एखाद्या समुदायाबद्दल किंवा जाती-जमातींबद्दल काय बोलतो आहोत, त्याचे गाव-खेड्यापाड्यांपर्यंत परिणाम कसे उमटू शकतात, याची जाणीव सर्व जबाबदार नेत्यांनी ठेवणे आवश्यक आहे.” हे विधान संग्राम जगतापांच्या अलीकडील वादग्रस्त विधानावरच ठराविक असल्याचे स्पष्ट झाले.

संग्राम जगताप यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिवाळीसाठी फक्त हिंदू दुकानदारांकडून खरेदी करावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले असून, मुस्लिम समाजाने विधानसभेत मत न दिल्यामुळे ते अशी विरोधी भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. यानंतर अजित पवारांनी पक्षप्रमुख म्हणून जगताप यांना नोटीस जारी केली असून, “हे विधान पक्षाच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे. पक्ष अशा गोष्टींना सहन करणार नाही,” असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “निवडणुकीत एखाद्या समुदायाने मत दिले नाही म्हणून पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. याची पक्षाला दखल आहे, ही जाणीव सर्वांना असू द्या. प्रत्येक निवडणुकीत एखादा समाज घटक नेहमी सोबत राहतोच असे नाही. एका निवडणुकीत त्यांनी मत न दिले म्हणजे ते शत्रू झाले असे समजू नये.”

राष्ट्रवादी काँग्रेसची मुळे शेतकऱ्यांमध्ये रुजलेली असून, पक्षाचा बाज ग्रामीण आहे. एका विधानाचा पुढचा-मागचा संदर्भ न देता माध्यमे चुकीचे चित्र रंगवतात, पण त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होऊ शकतो. त्यामुळे काय बोलतो आहोत याचे भान ठेवा. काही जण जाणीवपूर्वक प्रक्षोभक आणि भावना दुखावणारी वक्तव्ये करतात. मात्र, यापुढे अशा गोष्टी मी वेगळ्या प्रकारे घेईन, असे म्हणत पवारांनी जगताप यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!