Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाघांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करा; वनमंत्र्यांनी दिल्या सूचना

वाघांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करा; वनमंत्र्यांनी दिल्या सूचना

मुंबई : वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे इतर ठिकाणीही विशेष पथके गठीत करण्यात यावीत. अशी पथके गठीत करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

वनमंत्री नाईक यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात व्याघ्र शिकार प्रतिबंध संदर्भात बैठक झाली. बैठकीस मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. एस. राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

वनमंत्री नाईक म्हणाले, अवैधरित्या वाघांची शिकार करणाऱ्यांवर कायद्याचा चाप बसला पाहिजे. अशी शिकार करणाऱ्या टोळ्यांची साखळी उध्वस्त होणे आवश्यक आहे. यासाठी गस्त वाढवणे, वाघांच्या भ्रमंती मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, खबऱ्यांचे जाळे विकसित करणे, संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि यासाठी असलेली साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून घ्यावी. वाघांची शिकार रोखण्यासाठी स्थानिक लोक महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. स्थानिकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. गस्त वाढवण्यात यावीत. यामध्ये अन्य विभागांचे सहकार्य घेण्यात यावे.

वाघ शिकार प्रकरणात अटक केलेल्यांची सखोल चौकशी करावी. तपासणी करण्यासाठी अन्य संबंधित विभागांची मदत घ्यावी, अशा सूचनाही वनमंत्री नाईक यांनी दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!