Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी घडामोड..! वसई-विरार महापालिका निवडणुकीत मनसे अन् बविआची युती; ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत

मोठी घडामोड..! वसई-विरार महापालिका निवडणुकीत मनसे अन् बविआची युती; ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत

Vasai-Virar Municipal Corporation : वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून, बहुजन विकास आघाडी (BVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात युतीची शक्यता मजबूत मानली जात आहे. मात्र, निवडणूक चिन्ह आणि जागावाटपावरून चर्चा अडली असून, येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होईल.

BVAचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह भेट झाली आहे. मनसेला वसई-विरारमध्ये स्वतंत्र ताकद नाही, त्यामुळे पक्षविस्तारासाठी BVA सोबत युतीचा निर्णय घेतला आहे. BVAने मात्र युतीसाठी आपल्या चिन्हावर (ट्रॉली) लढण्याची अट घातली आहे. याबाबत मनसेकडून दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी उबाठा, काँग्रेस आणि मनसे नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेऊन महाविकास आघाडी (MVA) सोबत BVAला सामावून घेण्याची चर्चा केली होती. मात्र, चिन्ह आणि जागांवरून मतभेद झाल्याने उबाठा वेगळा लढण्याच्या तयारीत आहे.

महायुतीकडून मजबूत तयारी

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांच्यात युती निश्चित झाली आहे. भाजपला सुमारे ९१ जागा आणि शिंदे सेनेला २४ जागा देण्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत BVAला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे महायुती BVAच्या बालेकिल्ल्यात सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहे.

मागील निवडणुकीचा निकाल (२०१५)
– एकूण जागा: ११५
– बहुजन विकास आघाडी (BVA): १०६ जागा
– शिवसेना: ५ जागा
– भाजप: १ जागा
– इतर/अपक्ष: ३ जागा

सध्याची महापालिका: २९ प्रभाग, ११५ नगरसेवक (५८ महिला राखीव). २०२० पासून प्रशासक राजवट सुरू आहे.

या घडामोडींमुळे वसई-विरारची निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. BVA-MNS युती निश्चित झाल्यास विरोधकांना मोठा फटका बसेल, तर ठाकरे गट स्वबळावर लढल्यास मतविभाजन होऊ शकते. पुढील दिवसांत अधिक स्पष्टता येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!