Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजगड तालुक्यात 7 वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण; पाठीला, मानेवर खोलवर जखमा

राजगड तालुक्यात 7 वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण; पाठीला, मानेवर खोलवर जखमा

राजगड: राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वेल्हे बुद्रुक येथे सात वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित शिक्षकाने माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण मिटविण्यात आले आहे. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी, स्थानिक कार्यकत्यांनी मोठे प्रयत्न करून प्रकरण मिटवले.

आरोही अजित चव्हाण असे इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या सात वर्षांच्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षकाच्या अमानुष मारहाणीत तिच्या पाठीला, मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. ही मारहाणीची घटना बुधवारी (दि.१२) दुपारी घडली. मात्र, तिसऱ्या दिवशीही तिच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, जखमा या दिसतच होत्या. याबाबत तिचे वडील अजित चव्हाण यांनी सांगितले की, आरोही हिने परीक्षेचा पेपर लिहिला नव्हता. त्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने आरोहीला अमानुष मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. असे झाले तरी वडील अजित चव्हाण यांनी स्थानिक वेल्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही.

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले, अजित चव्हाण व इतर नागरिक, महिला पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी आरोही हिच्यावर उपचार करण्यासाठी लेखी पत्र तातडीने देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात चव्हाण यांनी तक्रार दाखल केली नाही. वेल्हे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक भरत शेंडकर म्हणाले, संबंधित शिक्षकाने असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे सांगून माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले आहे, मात्र वास्तवात स्थानिक पातळीवर दबाव वाढल्याने अखेर प्रकरण मिटविण्यात आले आहे. अजित चव्हाण हे मुळचे सातारा येथील आहेत. गेल्या पाच वषर्षांपासून ते वेल्हे बुद्रुक येथे मिळेल तेथे राहुटी उभारून वास्तव्य करत आहे दगड फोडून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मारहाण झाल्यापासून ते भयभीत झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!