Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांसाठी गुड न्यूज; गॅस बुकींगनंतर ९६ तासांत घरपोच सिलेंडर! जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना कठोर आदेश

पुणेकरांसाठी गुड न्यूज; गॅस बुकींगनंतर ९६ तासांत घरपोच सिलेंडर! जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना कठोर आदेश

पुणे : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे (US-Israel vs Iran War) व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी येत असताना घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) टंचाईची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. गुढी पाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना एजन्सींना गर्दी आणि रांगा लागल्या आहेत. मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाची घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

९६ तासांत घरपोच डिलिव्हरी बंधनकारक

जिल्हाधिकारी कार्यालयात तेल कंपन्या आणि गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत डुडी यांनी आदेश दिले की, गॅस सिलेंडर बुकींग केल्यानंतर ९६ तासांच्या आत (४ दिवसांत) घरपोच डिलिव्हरी करणे बंधनकारक आहे. हे वितरण फक्त OTP व्हेरिफिकेशनद्वारे होईल. ग्राहकाने OTP दिल्याशिवाय सिलेंडर देण्यात येणार नाही. एजन्सींना गोदाम किंवा ऑफिसवरून थेट वितरण बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एजन्सींनी हे नियम दर्शवणारे बोर्ड लावणेही अनिवार्य केले आहे.

घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, पुणे शहर आणि जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत सुरू असून, नागरिकांनी घाबरून रांगा लावू नयेत किंवा पॅनिक बुकिंग करू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. परवाने निलंबित करण्याची चेतावनीही दिली आहे.

पोलिसांनाही सूचना

वितरण सुरळीत आणि सुरक्षित व्हावे यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत:
-एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नियमित पाहणी.
-एजन्सींनी मदत मागितल्यास तात्काळ सहकार्य.
-वितरणात अडथळा आणणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई.

गुढी पाडव्यावर साखर हारांच्या किंमतीत ४० टक्के वाढ

युद्धामुळे व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल्स, खानावळी, मेस आणि साखर हार बनवणाऱ्यांना लाकूड/डिझेल भट्ट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढून गुढी पाडव्याच्या साखर हारांच्या किंमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!