Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता; ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता; ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Junnar Gold Mango: कोकणातील हापूस याला आब्यांचा राजा म्हणून ओळखल जात. त्यात आता पुणे जिल्ह्याच्या कृषी समृद्ध जुन्नर तालुक्याच्या मातीतून आंब्याची नवी प्रजाती समोर आली आहे. प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेला ‘जुन्नर गोल्ड’ या आंब्याला केंद्र शासनाकडून जीआय टॅग मिळाला आहे. त्यामुळे ‘जुन्नर गोल्ड’ वाण आता केवळ स्थानिक बाजारापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याला केंद्र शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

जुन्नर गोल्डची वैशिष्ट्ये
जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी गावचे शेतकरी भरत जाधव यांनी अनेक वर्षांच्या अथक प्रयोगातून ‘जुन्नर गोल्ड’ हा आंब्याचा खास वाण विकसित केला. दिल्ली येथील प्रोटेक्शन ऑफ प्लान्ट व्हरायटिझ अँड फार्मर्स राईट ऑथरिटी या संस्थेकडून या वाणाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

या आंब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात हापूसचा अप्रतिम स्वाद, केशरचा आकर्षक रंग आणि राजापुरीचा मोठा आकार अशा तिन्ही उत्तम गुणांचा अनोखा संगम आहे. या आंब्याचे फळ जवळपास 900 ग्रॅम ते 1 किलो वजनाचे असते. आकर्षक रंग आणि चवीमुळे बाजारात याला मोठी मागणी आहे

कृषी क्षेत्राला नवी ओळख

या यशाबद्दल भरत जाधव यांचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. या ‘जुन्नर गोल्ड’ वाणामुळे जुन्नर तालुक्याच्या कृषी परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे हा वाण विकसित करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न तात्या मेहेर यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, “भरत जाधव यांनी अनेक वर्ष केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे जुन्नरला एक अद्वितीय ओळख मिळाली आहे. कृषी विज्ञान केंद्राने त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन पुरवले.”

शेतकरी भरत जाधव यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी लहानपणापासून आंब्यावर प्रयोग करत होतो. आज माझ्या आंब्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली, याचा खूप आनंद आहे. यामुळे जुन्नरच्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!