Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Crime: तीन वर्षांनंतर मिळाला न्याय; बारामतीतील सरपंच महिलेच्या पतीच्या हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप

Baramati Crime: तीन वर्षांनंतर मिळाला न्याय; बारामतीतील सरपंच महिलेच्या पतीच्या हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप

Baramati Crime: बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सरपंच महिलेच्या पतीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने कठोर निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी कामगाराला बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजय बर्डे यांनी हा निकाल जाहीर केला. या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव पनीश ऊर्फ पांग्या आनंद्या भोसले असे आहे. सोनगाव येथील रहिवासी असलेले युवराज थोरात (वय ५०) यांची हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर सिद्ध झाला. या संदर्भात युवराज थोरात यांच्या मुलाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

ही धक्कादायक घटना १५ जानेवारी २०२० रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी घडली होती. बारामतीजवळ नीरा–कऱ्हा नदीच्या संगमावर असलेल्या सोनेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या युवराज थोरात यांच्याशी आरोपीने वाद घातला. शिवीगाळ करत “सरपंच झाल्यामुळे फार माज आला आहे, एकेकाला भोसकून काढतो,” अशी धमकी देत आरोपीने थोरात यांच्यावर सुर्‍याने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा – Farmer Suicide in Maharashtra: शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ; 11 महिन्यात मराठवाडा अन् विदर्भात आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर

पुरावे सिद्ध झाल्याने आरोपीला शिक्षा

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी एकूण तेरा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. चार प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग तसेच गुन्ह्यात वापरलेला सुरा हे महत्त्वाचे पुरावे ठरले आणि त्याच्या आधारे आरोपी दोषी ठरवण्यात आला.

हेही वाचा – Satara Doctor Case: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! हातावरची नोट कुणी लिहिली? फडणवीसांनी अधिवेशनात केला मोठा खुलासा

दरम्यान, या घटनेने त्यावेळी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सरपंच जयश्री युवराज थोरात यांचे पती असलेल्या युवराज थोरात यांनी महिलेला त्रास देणाऱ्या तरुणाला रोखल्याचा राग मनात धरून आरोपीने हा जीवघेणा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. घटनेनंतर संतप्त जमावाने पारधी समाजाच्या घरांना आग लावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!