पुणे : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून (दि. २१) द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी 3490 कोटी रुपये वित्त विभागाकडून वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीमध्ये लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता उद्या शुक्रवारपासून लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात गेल्या डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र होऊन जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थ्यांची संख्या होती. अद्याप फेब्रुवारी महिन्याची आकडेवारी आलेली नाही. त्यामध्ये देखील अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.


