Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Railway: पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट! कोल्हापूर, लातूरसह ‘या’ विशेष गाड्या नव्या वर्षातही धावणार

Pune Railway: पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट! कोल्हापूर, लातूरसह ‘या’ विशेष गाड्या नव्या वर्षातही धावणार

Pune Railway: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या चार प्रमुख विशेष गाड्यांची सेवा आता फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. डिसेंबरमध्ये संपणारी या गाड्यांची मुदत वाढवल्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘या’ गाड्यांच्या कालावधीत झाली वाढ:

  • सोलापूर-दौंड-सोलापूर (०१४६१/६२): ही अनारक्षित गाडी आता २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज धावेल.
  • पुणे-कोल्हापूर-पुणे (०१०२३/२४): ३१ डिसेंबरला मुदत संपत असलेल्या या गाडीलाही २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
  • पुणे-हरंगुळ (लातूर)-पुणे (०१४८७/८८): या गाडीची सेवा २६ जानेवारीपर्यंत नियमित असेल.
  • हडपसर-हरंगुळ (लातूर)-हडपसर: २७ जानेवारीपासून ही गाडी हडपसरवरून सुटेल आणि २८ फेब्रुवारीपर्यंत तिची सेवा सुरू राहील.

प्रवाशांची मागणी

पुणे-कोल्हापूर आणि पुणे-लातूर या गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गाड्या ‘विशेष’ म्हणून न चालवता त्या कायमस्वरूपी ‘नियमित’ कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून जोर धरत आहे.

हेही वाचा – Pune Nashik Rail: चाकणच्या विकासाला ‘ब्रेक’! पुणे-नाशिक रेल्वे मार्गात बदल, आढळराव पाटलांचा गंभीर इशारा

देशभरात २४४ विशेष गाड्यांचे जाळे

केवळ पुणेच नव्हे, तर भारतीय रेल्वेने नवीन वर्ष आणि सुट्ट्यांचा हंगाम पाहता मुख्य ८ मार्गांवर एकूण २४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी मुंबई-मडगाव मार्गावर साप्ताहिक तसेच दैनंदिन विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –Konkan Railway: फुकट्या प्रवाशांमुळं कोकण रेल्वे मालामाल! एका महिन्यात 2.33 कोटींचा दंड वसूल

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांचे मार्ग, थांबे आणि वेळ यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आगामी काळात गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी लेटेस्ट अपडेट्ससाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला किंवा NTES ॲपला भेट द्यावी.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!