Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर; चौकशी अहवालाने एकच खळबळ, नेमकं काय म्हटलंय ?

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर; चौकशी अहवालाने एकच खळबळ, नेमकं काय म्हटलंय ?

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवी हिचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणेचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही, तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे. त्याच दिशेने पोलिसांनी तपास करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालात चौकशी समितीने आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत देखील महत्वाची शिफारस केली आहे.

जालिंदर सुपेकर यांचा सहभाग वैष्णवीच्या प्रकरणात आढळून आला आहे. त्यांची ध्वनिफीत देखील समोर आली. त्यामुळे सुपेकरांना निलंबित करत सहआरोपी करण्याची शिफारससुद्धा समितीने केली आहे. समितीचा तिसरा महत्वाचा निष्कर्ष पुणे ग्रामीण पोलिसांबाबत आहे. वैष्णवीची आत्महत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे समितीने म्हटले आहे. याबरोबरच वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीने मारहाण, छळ , विनयभंग , मारून टाकण्याची धमकी अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवीची आत्महत्या झाल्याचे म्हटले आहे

अहवालात काय?

1. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता

2. जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा

3. वरवर प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे आहे

4. सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा

5. वैष्णवी हगवणेंना पती,सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण,छळ,जाच झाला

6. हुंडा रुपात ब्रँडेड गाडी,चांदीची भांडी,सोने,रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे

7. तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या..

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!