Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वानवडी परिसरात गुंडांची दहशत! टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; तरूणावर हल्ला, एकाला अटक

वानवडी परिसरात गुंडांची दहशत! टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; तरूणावर हल्ला, एकाला अटक

पुणे : वानवडी परिसरात दुचाकीस्वार टोळक्याने तरूणाला अडवून त्याच्यावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केल्याची घटना 28 ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास शिंदे वस्तीवरील एसआरए इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.

एस. सचिन कांबळे (वय 20, रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 44 वर्षीय तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदे वस्ती परिसरात थांबलेले असताना, दुचाकीस्वार पाचजणांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली.

त्यानंतर परिसरात मोठमोठ्याने आरडाओरड करीत शांतता भंग केली. याप्रकरणी कांबळेला अटक करीत असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!