Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा: चंद्रशेखर बावनकुळे

अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा: चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे. गाव भेट दिल्यास गावातील समस्या समजून घेण्यास मदत होईल. आठवड्यातून एक दिवस अधिकाऱ्यांनी संबंधित गावात भेटी देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सांगितले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी कोदामेंढी आणि खात या मौदा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या वेळ मिळत आहे तशा तक्रारी समजून घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासकामांसाठी अनुकूल लागणारे निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या क्षेत्रासाठी काय नवनिर्माण होत आहे याची अपेक्षा नागरिकांना असते. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अडचणी व समस्या समजून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला गाव दौरा करायचे ठरविले आहे. गाव भेटीत सरपंच आणि जनतेने दिलेले निवेदन घेऊन त्यावर उचित कार्यवाही होणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी पादंण रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असतो पुढील पाच वर्षात पानंद रस्ते मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहत भक्कमपणे काम सुरू असल्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे यावेळी म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!