पंढरपूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून नगरसेवकाने कोयत्याने तिघांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ‘आमच्याकडे भिशी का लावत नाही?’ या कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी नगरसेवक लोकेश यादव, माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह सुमारे २० जणांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकेश यादव हे भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


