Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SC On Shiv Sena : शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा? पुन्हा ‘तारीख पे तारीख’; आता थेट…

SC On Shiv Sena : शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा? पुन्हा ‘तारीख पे तारीख’; आता थेट…

SC On Shiv Sena : अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिलेल्या शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावरील सुनावणी आज पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयातील व्यग्र वेळापत्रकामुळे आज या प्रकरणावर युक्तिवाद होऊ शकला नाही. आता या प्रकरणाचा फैसला शुक्रवारी, म्हणजेच २३ जानेवारी रोजी होणार आहे. योगायोगाने याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने या सुनावणीला भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुनावणी लांबणीवर पडण्याचे नेमके कारण काय?

आज सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणे सुनावणीसाठी होती. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादाचे प्रकरण ३७ व्या क्रमांकावर होते. सुनावणी न होण्यामागे दोन मुख्य तांत्रिक कारणे समोर आली आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत आज केवळ दुपारी १ वाजेपर्यंतच नियमित खंडपीठाचे कामकाज पाहणार होते. दुपारनंतर सरन्यायाधीश ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाशी संबंधित विशेष खंडपीठात व्यस्त राहणार असल्याने, शिवसेनेच्या सत्तासंघर्षाला पुरेसा वेळ देणे शक्य झाले नाही.

हेही वाचा – Eknath Shinde : मुंबईच्या महापौरपदाचा पेच दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची गुपचूप दिल्ली वारी; भाजप नेत्यांसोबत खलबतं

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘न्याय’ कुणाला?

आता शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या महायुद्धाला सुरुवात होईल. गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेला हा कायदेशीर लढा आता अंतिम टप्प्यात आल्याचे मानले जात आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, त्यांच्याच जयंती दिवशी पक्षाचे नाव आणि चिन्हावर कुणाची मोहोर उमटणार, याचा कायदेशीर फैसला होणार आहे. यामुळे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!