Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Ratna Award: ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण’ सोहळा दिमाखात; 101 गुणवंतांचा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरव

Maharashtra Ratna Award: ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण’ सोहळा दिमाखात; 101 गुणवंतांचा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरव

इंदापूर : प्रतिनिधी पुणे येथील वानवडी भागातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. युवा प्रबोधन साहित्य मंच, ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था आणि बंडखोर साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “कार्य तुमचे, कर्तव्य आमचे” या उदात्त ब्रीदवाक्याला अनुसरून राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०१ गुणवंतांना यावेळी ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संविधानाच्या साक्षीने सोहळ्याचा प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात कविता काळे यांनी सादर केलेल्या संविधान प्रतिज्ञेने झाली, ज्यातून सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन आर.पी.आय.चे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे होते. यावेळी विचारपीठावर माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, प्रसिद्ध व्याख्याते संपत गारगोटे, कवी जितेन सोनवणे, साहित्यिक वीणा कडू आणि वृषाली वीरगुर्जर यांसारख्या दिग्गज व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. आंबेडकरांचे विचार आचरणात आणा: विशाल लोंढे
आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल लोंढे यांनी उपस्थित तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ वाचनापुरते किंवा भाषणापुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.” समाजाच्या प्रगतीसाठी विचारांची कृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कलाकारांच्या उपस्थितीने वाढली सोहळ्याची रंगत
या पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे चित्रपट अभिनेत्री गौरी गायकवाड आणि प्रसिद्ध लावण्यवती काव्या मुंबईकर यांची उपस्थिती. त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि सोहळ्याला एक वेगळीच ग्लॅमरस झालर लाभली. दुपारी ३:३० ते ६ या वेळेत रंगलेल्या या सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन गौतम भंडारे यांनी केले, तर आयडियल ॲड कंपनीचे संस्थापक संतोषभाऊ वाकोडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

नियोजनामुळे सोहळा ठरला यशस्वी
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या पुणे जिल्हाध्यक्षा ज्योतीताई गायकवाड (लोंढे), अश्विनीताई लोंढे, सोनाली सुतार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे कार्यक्रमाचा दर्जा उंचावला, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना व्यासपीठ मिळवून देणारा आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!