हैदराबाद: चारित्र्यावर संशय घेत २१ वर्षीय तरुणाने गर्भवती पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने पत्नीच्या पोटावर बसून तिचा गळा दाबला. गर्भातील ७ महिन्यांचे भ्रूण बाहेर पडले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये १६ जानेवारी रोजी ही घटना घडली. २१ वर्षीय सचिन सत्यनारायण नावाच्या तरुणाला राचकोंडा
कुशाईगुडा पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, १६ जानेवारी रोजी स्नेहा ही घरात झोपलेली होती. त्यावेळी आरोपी घरात आला आणि स्नेहाच्या पोटावर बसला. आरोपीने जोरात पत्नीचा गळा दाबला. यात महिलेच्या पोटातील भ्रूण गर्भातून बाहेर आले. यात आरोपीची पत्नी स्नेहा आणि भ्रूणाचा मृत्यू झाला.


