Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Toshakhana Case: मोठी बातमी! तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना प्रत्येकी 17 वर्षांची शिक्षा

Toshakhana Case: मोठी बातमी! तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना प्रत्येकी 17 वर्षांची शिक्षा

Toshakhana Case: तोशाखाना-२ प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी विशेष संघीय तपास संस्था (एफआयए) न्यायालयाने हा निकाल दिला. हा खटला अत्यंत कमी किमतीत महागड्या बुल्गारी दागिन्यांचा सेट खरेदी केल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणात सरकारी तिजोरीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

आदियाला तुरुंगातच सुनावणी

रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश (सेंट्रल) शाहरुख अर्जुमंद यांनी निकाल सुनावला. इम्रान खान सध्या याच तुरुंगात शिक्षा भोगत असून, न्यायालयीन कामकाजही तेथेच पार पडले.

न्यायालयाने इम्रान खान यांना

पाकिस्तान दंड संहिता कलम ४०९ (विश्वासघाताचा गुन्हेगारी भंग) अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ५(२)४७ अंतर्गत ७ वर्षे शिक्षा अशी एकूण १७ वर्षांची शिक्षा सुनावली.

बुशरा बीबी यांनाही समान शिक्षा

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही याच कलमांखाली १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणातील त्यांची भूमिका गंभीर असल्याचे नमूद केले. याशिवाय, न्यायालयाने इम्रान खान आणि बुशरा बीबी दोघांवर प्रत्येकी १६.४ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

शिक्षेत उदारता का दाखवली?

न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षा निश्चित करताना इम्रान खान यांचे वय आणि बुशरा बीबी महिला असल्याचा घटक विचारात घेण्यात आला. या बाबी लक्षात घेता न्यायालयाने तुलनेने सौम्य शिक्षा देण्याचा उदार दृष्टिकोन स्वीकारला, असे आदेशात म्हटले आहे.

तोशाखाना-२ प्रकरण नेमके काय?

तोशाखाना-२ प्रकरण हे सरकारी भेटवस्तूंच्या गैरवापराशी संबंधित आहे. आरोपानुसार, इम्रान खान आणि बुशरा बीबी यांनी नियमांचे उल्लंघन करून अत्यल्प किमतीत महागडे बुल्गारी दागिने खरेदी केले, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. निकालानंतर इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या कायदेशीर पथकाने उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या वकिलांच्या मते, हा निर्णय कायदा आणि तथ्यांच्या विरोधात असून, त्याविरोधात लवकरच अपील दाखल करण्यात येणार आहे. या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!