Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Municipal Election: महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट; आज जाहीर होणार वेळापत्रक?

Municipal Election: महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट; आज जाहीर होणार वेळापत्रक?

Municipal Election: राज्यातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज मोठा निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ असेही संबोधले जाते, कारण त्याचा थेट परिणाम राज्यातील राजकीय समीकरणांवर आणि शहरी कारभारावर होतो. त्यामुळे या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –Pimpri: पिंपरी महापालिका कर संकलन विभागात नियमबाह्य वसूली; 29 कोटींचा घोटाळा, आयुक्तांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश

29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड-वाघाळा, जळगाव, धुळे, मालेगाव, परभणी, जालना यांसह अनेक महत्त्वाच्या शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad: एका दिवसात तब्बल 724 फ्लेक्स, किऑक्स जप्त; महापालिकेकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल

राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्यामागे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेसंदर्भातील न्यायालयीन अडथळे ही प्रमुख कारणे होती. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण न झाल्याने निवडणुका रखडल्या होत्या. मात्र इम्पिरिकल डेटा संकलन आणि अहवाल सादर झाल्यानंतर हा अडथळा दूर झाला आहे. तसेच प्रभाग रचनेबाबतचे वादही बर्‍याच अंशी निकाली निघाल्यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. आज होणाऱ्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!