Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कर्णधार श्रेयस अय्यरचे ५० चेंडूंतील शतक व्यर्थ; कर्नाटकचा मुंबईवर ७ विकेट्स राखून विजय

कर्णधार श्रेयस अय्यरचे ५० चेंडूंतील शतक व्यर्थ; कर्नाटकचा मुंबईवर ७ विकेट्स राखून विजय

अहमदाबाद: विजय हजारे करंडक २०२४-२५ स्पर्धेच्या ‘क’ गटातील आणखी एका सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने कर्नाटकविरुद्ध अवघ्या ५० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले; पण कर्नाटकने ७ विकेट्स राखून विजय मिळवल्याने ते व्यर्थ रेले. श्रेयसने अवघ्या ५५ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ५ षटकार लगावले.

श्रेयसच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने कर्नाटकविरुद्ध ५० षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३८२ धावा केल्या. मुंबईच्या हार्दिक तामोरे (९४ चेंडूंत ८४), आयुष म्हात्रे (८२ चेंडूंत ७८) आणि शिवम दुबे (३६ चेंडूंत नाबाद ६३) यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाचा हातभार लावला.

विजयासाठीचे ३८३ धावांचे लक्ष्य कर्नाटकने ४६.२ षटकांत साध्य केले. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ कृष्णन श्रीजीतने १०१ चेंडूंत नाबाद १५० धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने चार षटकार आणि २० चौकार लगावले. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांना अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयश आले. मुंबईची गोलंदाजी पुरती निष्प्रभ ठरली. कर्नाटकच्या फलंदाजांनी मुंबईची गोलंदाजी झोडपून काढली. के. व्ही. अनिश (६६ चेंडूंत ८२), प्रवीण दुबे दुवे (५० चेंडूंत नाबाद ६५), कर्णधार मयंक अगरवाल (४८ चेंडूंत ४७) यांनीही विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!