Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव; गुणतालिकेमध्ये मोठी घसरण, भारत चौथ्या स्थानावर घसरला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव; गुणतालिकेमध्ये मोठी घसरण, भारत चौथ्या स्थानावर घसरला

India lost 1st Test vs South Africa: कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत असा 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामनखेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिल्याच सामन्यात 30 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र फिरकीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने भारताचं 35 ओव्हरमध्ये 93 धावांवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. या पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025–27 च्या गुणतालिकेवरही झाला असून भारत आता चौथ्या स्थानावर घसरला आहे.

WTC पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी घसरण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र कोलकाता कसोटीमधील पराभवानंतर भारत चौथ्या स्थानावर घसरला असून त्यांचे गुण टक्केवारी आता 54.17 आहे. भारताने या चक्रात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यात 4 विजय आणि 3 पराभव झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे फलंदाज ढेर

टीम इंडियाची 124 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. तसेच भारताला 100 धावाही करता आल्या नाहीत. आधीच भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल मानेच्या त्रासामुळे तिसऱ्या दिवशी खेळणार नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे भारताच्या हातात हा सामना जिंकण्यासाठी 9 विकेट्सच असल्याचं स्पष्ट होतं. अशात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. एकालाही मैदानात घट्ट पाय रोवून भारताला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. परिणामी भारताचा पराभव झाला.

दक्षिण आफ्रिकेची चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी…

दुसरीकडे, कोलकाता कसोटी मधील विजयामुळे दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्यांनी या चक्रात आतापर्यंत 3 सामने खेळले असून 2 विजय आणि 1 पराभवामुळे त्यांची गुण टक्केवारी 66.67 आहे.

ऑस्ट्रेलिया टेबल टॉपर, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025–27 गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 100% गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर श्रीलंका 66.67% गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान 50% गुणांसह पाचव्या, तर इंग्लंड 43.33% गुणांसह सहाव्या स्थानी आहे. अंतिम तीन स्थानी बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. त्यापैकी न्यूझीलंडने अद्याप या चक्रातील एकही सामना खेळलेला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!