Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’; अभिनेत्री ममता कुलकर्णीचं वादग्रस्त वक्तव्य

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’; अभिनेत्री ममता कुलकर्णीचं वादग्रस्त वक्तव्य

Mamta Kulkarni’s Controversial Statement: लोकप्रिय अभिनेत्री ते आता संत बनलेली ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात दाऊद इब्राहिमबद्दल विचारले असता, ममता यांनी केलेल्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. त्या म्हणाल्या, ‘माझा दाऊदशी काहीही संबंध नव्हता. त्याचा उल्लेख झाला होता, पण त्याने देशविरोधी काहीही केले नाही. मी कधीही त्याला भेटले नाही.’ या वक्तव्यानंतर ‘दाऊद दहशतवादी नाही’ असे सांगितल्याचा अर्थ घेत सोशल मीडियावर ममतांची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांच्या विधानावर टीका केली, तर काहींनी त्याला चुकीचा अर्थ लावल्याचे म्हटले.

यानंतर ममता कुलकर्णी यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, ‘मी केवळ गैरसमज दूर करण्यासाठी बोलले. माझे नाव कधीही दाऊदशी जोडले गेले नाही. मी कोणत्याही देशविरोधी कृतीशी संबंधित नव्हते. लोकांनी विवेकबुद्धी वापरून माझे बोलणे ऐकावे.’ गोरखपूरमधील पीपीगंज येथील कार्यक्रमात ममता कुलकर्णी महामंडलेश्वर लक्ष्मी किन्नर यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. त्या सध्या महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी या नावाने धार्मिक कार्यात सक्रिय आहेत.

एकेकाळी बॉलिवूडमध्ये ‘करण अर्जुन’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘बाजी’ सारख्या चित्रपटांतून आपले सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ममता, आता पूर्णपणे धर्म आणि साधनेच्या मार्गावर वळली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!