Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘यांच्याकडून काहीही चांगलं होऊ शकत नाही, म्हणूनचं…’; श्रीकांत शिंदेंची पहिल्यांदाच राज ठाकरेंवर टीका

‘यांच्याकडून काहीही चांगलं होऊ शकत नाही, म्हणूनचं…’; श्रीकांत शिंदेंची पहिल्यांदाच राज ठाकरेंवर टीका

Shrikant Shinde Criticizes Raj Thackeray: राज्यातील गडकिल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो पर्यटन केंद्रावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांनी केंद्रांबाबत केलेल्या तीव्र विरोधानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी ‘नमो पर्यटन केंद्र फोडून टाकू’ असा इशारा दिल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडून काहीही निर्माण होत नाही, ते नेहमी तोडफोडीचीच भाषा करतात. एवढी आगपाखड कशासाठी? हे केंद्र गडकिल्ल्यांवर माहिती आणि सुविधा देण्यासाठी उभारले जात आहे.

श्रीकांत शिंदे यांनी पुढे आठवण करून दिली की, कधीकाळी हेच राज ठाकरे नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते. आज मात्र त्यांनी विरोधाचं राजकारण सुरू केलं आहे. महायुती सरकार गडकिल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनाचं काम करतंय, त्यावर टीका करणं म्हणजे विकासाला विरोध आहे, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – इंदुरीकर महाराजांच्या घरी लगीन घाई! लेकीचा शाहीथाटात साखरपुडा; व्हिडिओ व्हायरल

उद्धव ठाकरेंवरही निशाणा

उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, लोकांना आता खरे आणि खोटे कोण हे समजले आहे. अतिवृष्टीच्या वेळी आमच्या सरकारने ३८ हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं. आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवत होते, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे आता शेतकरी त्यांच्या दौर्‍यांपासून दूर राहतात. निवडणुकीपूर्वी आश्वासने देऊनही लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही.

दरम्यान, राज्य सरकारने पर्यटन विकासासाठी ‘नमो केंद्र’ उभारणीचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांमधून किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती, मार्गदर्शन आणि पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवून शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींचं नाव असलेलं केंद्र आम्ही फोडून टाकू, असा इशारा दिला होता. या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!