Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

Devendra Fadnavis Met Sanjay Raut: मुंबईत अन्न व नागरी पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटांची चर्चा पार पडली. मात्र, यावेळी दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आवश्यक उपचारांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावर राऊत यांनी आभार व्यक्त केले. तसेच, या विवाह सोहळ्यात राज्याचे मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते आणि त्यांनी देखील दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

हेही वाचा – Devendra Fadnavis : उद्याची मतमोजणी रद्द, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे, कारण अलीकडेच नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी याआधी अमित शाह यांची भेट घेतली होती.

हेही वाचा – Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊतांची पहिली पत्रकार परिषद, शिंदे-भाजपवर सडकून टीका, काय म्हणाले?

दरम्यान, नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एका फ्रेममध्ये दिसले. त्यामुळे या दोघांमध्ये कोणत्याही स्वरुपाची राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे जाहीर केले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!