Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे नोकरीची संधी; 100 रिक्त पदे भरली जाणार…

Job News ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे नोकरीची संधी; 100 रिक्त पदे भरली जाणार…

पुणे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर ९ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड येथे अपरेंटिस {कोपा/ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)} यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : अपरेंटिस {कोपा/ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)}.
– रिक्त पदे : 100 पदे.

– नोकरीचे ठिकाण : बीड.
– शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण , NCVT (१०+२ या बंधातील) कोपा/ वीजतंत्री (Electrician) /तारतंत्री (Wireman) या ट्रेडमध्ये उत्तीर्ण.

– वयोमर्यादा : किमान १८ वर्षे
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / प्रत्यक्ष.

– कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या., विद्युत भवन जालना रोड, कार्यालय मंडळ, बीड.

– कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी : ०८ आणि ०९ जानेवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!