Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: आधी काठीने वार, मग दगडाने ठेचलं…किरकोळ वादातून पुण्यात पतीने पत्नीला संपवलं

Pune Crime: आधी काठीने वार, मग दगडाने ठेचलं…किरकोळ वादातून पुण्यात पतीने पत्नीला संपवलं

Pune Crime: मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे परिसरात एका पोटतिडकीने काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच पतीने क्रूर अंत केला आहे. भंगार विकून आलेल्या पैशांच्या हिशोबावरून झालेल्या किरकोळ वादाने इतके रौद्र रूप धारण केले की, पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बावधन पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमका वाद कशासाठी?

कुसुम वसंत पवार (३२) आणि आरोपी दत्ता काळुराम जगताप (३०) हे दोघे म्हाळुंगे परिसरात भंगार गोळा करणे आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी (१७ जानेवारी) जमा केलेल्या भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दत्ताने रागाच्या भरात विवेक गमावला.

अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताने आधी कुसुम यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. मारहाणीमुळे कुसुम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्या. मात्र, एवढ्यावरही दत्ताचा राग शांत झाला नाही; त्याने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि कुसुम यांच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात कुसुम यांचा जागीच मृत्यू झाला.

मध्यस्थी करणाऱ्यावरही धावून गेला आरोपी

हे पती-पत्नीचे भांडण सुरू असताना एका महिलेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या दत्ताने त्या महिलेवरही काठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादी महिलेच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झाली आहेत.

तीन मुले झाली पोरकी

मयत कुसुम यांना तीन मुले असून, त्यांच्या हत्येमुळे या चिमुकल्यांचे छत्र हरपले आहे. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी दत्ता जगताप याला अटक केली आहे. भंगाराच्या पैशांच्या हिशोबावरून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!