Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalgaon: जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी

Jalgaon: जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी

Jalgaon: शहरातील चक्क शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये हाणामारीची घटना घडली असून तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या सोबतच्या दोन जणांना मारहाण झाल्याची माहिती आहे. वाल्मिक नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणांच्या एका गटाचा वाद झाला होता. या वादानंतर भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे काही जणांसोबत तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात आले होते. याचदरम्यान दुसरा गट पोलीस ठाण्यात शिरला आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या काही जणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शहरात परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस ठाण्यातही गोंधळ झाला होता.

शहरातील माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील दुसऱ्या गटातील तरुणांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत घटनेवर नियंत्रण मिळवले, भाजपच्या माजी नगरसेवकांना पोलीस वाहनातून दुसरीकडे हलवण्यात आलं. या घटनेनंतर राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त शनिपेठ पोलीस ठाण्यात तसेच पोलीस ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पाहणी करत संबंधित घटनेची माहिती घेत आहेत.

दोन्ही गटाचे 10 जण ताब्यात
पोलीस ठाण्यातच झालेल्या या दोन गटातील वादाला महानगरपालिकेच्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे. मनपामधील टेंडर मिळविण्याच्या कारणावरून वाद वाढून त्याचे रुपांतर दोन गटातील हाणामारीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर दोन्ही गटाच्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!