Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Gaikwad: कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक

Sanjay Gaikwad: कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक

बुलढाणा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकी भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेना आमदाराने भाजपला थेट चॅलेंज दिलंय. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील आणि विविध पक्षातील सहाशे कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर, मित्र पक्षाकडून अन्याय होत असल्याबाबत बोलताना भाजपला थेट आव्हान देण्यात आलंय. यापुढे जर मित्रपक्षाने कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय केला तर गाठ माझ्याशी आहे, कोणाची माय ** नाही, अशा शब्दात संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांना, विशेषत: आमदार श्वेता महाले आणि पती विद्याधर महालेंना उद्देशून टीका केलीय.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत सातारा जिल्हा परिषदेतील वादावरुन भाजप आणि शिवसेना मंत्री सभागृहातही भिडल्याचं पाहायला मिळालं. तर, ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजप आमदारानेही एकनाथ शिंदेंना घेरलं. एकीकडे भाजप-शिवसेनेतील हा वाद सुरू असतानाच बुलढाण्यातही अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. संजय गायकवाड यांनी भाजप आमदाराला थेट इशाराच दिलाय. “निवडणुकीत आपल्या नेत्याला जिंकून येण्यासाठी कार्यकर्ता काय काय टोले घेत असतो हे त्याच कार्यकर्त्याला माहित असतं. चिखली मतदारसंघात हे चित्र आम्ही बघत आहोत. मात्र, आम्ही मित्र पक्ष म्हणून दुर्लक्ष केलं. बाकी गोष्टी मी तुमच्या मतदारसंघात भाषण करेल त्यावेळेस बोलेल. कार्यकर्त्यांचा छळ किती करायचा? मी त्या मतदारसंघात (चिखली) बघितलं की, खूप त्रास त्या कार्यकर्त्यांना आहे. आता ते प्रकरण माझ्याकडे आलं आहे, आता कुणाची माय ** नाही. आता मी बघतो ते (आ.श्वेता महाले दांपत्य ) कुणाकुणाला त्रास देतात, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी भाजपला इशारा दिलाय.

अरे आम्ही तर आखाड्यातले आहोत, मैदानातले आहोत, तुम्ही तर फक्त घरातल्या आहात. पण काळजी करू नका, आपल्याला चिखली मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढणार? हे सगळ्यांना माहीत आहे. सध्या तरी शिवसेनेचा खासदार तिथे आहे. त्यामुळे ती चिंता तुम्ही करू नका, पक्ष म्हणून चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे, असे आवाहन गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले.

खासदार प्रतापराव जाधवांनाही आव्हान
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे मात्र जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण, पुढल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून कोण लढणार? यावर संजय गायकवाड यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अर्थात आपल्याच पक्षाचे विद्यमान खा. प्रतापराव जाधव यांनाही त्यांनी आव्हान दिलं आहे. प्रतापराव जाधव यांच्या पुढील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तर मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या चिखली येथील आमदार श्वेता महाले यांनाही आव्हान दिलं. त्यावरून बुलढाण्यात महायुतीतच नव्हे तर शिवसेनेतही अंतर्गत कलह निर्माण झाला आहे का? असा सवाल उपस्थित राहत आहे.

भाजप अन् शिवसेनेता एकाच दिवसात तीन मोठे वाद
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरुन भाजप-सेना हमरीतुमरीवर आल्याचं पाहायला मिळालं. तर, भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत गैरव्यवहार झाल्याचं सांगत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलं. विदर्भातील बुलढाण्यात संजय गायकवाड यांनी मित्रपक्ष भाजपबद्दल आक्षेपार्ह टीका केली. आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती विद्याधर महालेंना उद्देशून (नाव न घेता) टीका करताना कुणाची माय व्याXX बघतोच असं ते म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!