Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बॉलिवूडवरही युद्धाचा परिणाम; अक्षय कुमार चिंतेत, म्हणाला, “सर्वांचा व्यवसाय उद्ध्वस्त…”

बॉलिवूडवरही युद्धाचा परिणाम; अक्षय कुमार चिंतेत, म्हणाला, “सर्वांचा व्यवसाय उद्ध्वस्त…”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण देश-विदेशातील परिस्थितीबद्दलची त्याची चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाचा परिणाम भारतावरही होत आहे. असे असताना अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीबद्दल आपली चिंता व्यक्त केली.

अक्षय कुमार म्हणाला, “सध्या आमच्यासाठी सिनेमा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मला आशा आहे की, जे कॉन्सर्ट रद्द होत आहेत ते पुन्हा सुरू होतील. सर्वांचा व्यवसाय सुरू राहिला पाहिजे. युद्धाच्या परिस्थितीत सर्वांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. शेअर बाजारही कोसळत आहे. सध्याच्या परिस्थितीचा परिणाम केवळ सामान्य लोकांवरच नाही तर मनोरंजन उद्योगावरही होत आहे. मात्र, अशा काळातही ‘धुरंदर २’ सारखे स्पाय चित्रपट कोट्यवधींचा व्यवसाय करत आहेत. पण अक्षयला त्याच्या चित्रपटाच्या यशाची चिंताही वाटत आहे.

अक्षय कुमारने यापूर्वी त्याच्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या शोमध्ये जगभरात सुरू असलेल्या युद्धांबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याने लोकांना आवाहन केले होते, जगात खूप समस्या सुरू आहेत. अनेक युद्धे सुरू आहेत. आपण प्रार्थना केली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी एक छोटी प्रार्थना करा, जेणेकरून आपण सर्व सुरक्षित राहू शकू.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!