Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dasara Melava: दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

Dasara Melava: दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

Dasara Melava 2025: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चांना वेग आला आहे. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा 2 ऑक्टोबरला शिवतीर्थावर पार पडणार आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार का, त्यांना निमंत्रण दिले जाणार का आणि या व्यासपीठावर युतीसंदर्भात घोषणा होणार का? अशा अनेक तर्कांना उधाण आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही भावांची भेटीगाठी वाढल्याने या चर्चेला अधिक चालना मिळाली आहे. आधी मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या मेळाव्यात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले, तर उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थ बंगल्यावर गणेशोत्सवाला गेले होते. या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत मिळत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंचीही तोफ धडाडणार? मोठी अपडेट समोर

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा 58 वर्षांची परंपरा जपत दरवर्षी होत आला आहे. यापूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे या व्यासपीठावरून शिवसैनिकांना विचारांचे सोनं वाटायचे. सध्या उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून हे कार्य करत आहेत. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे सहभागी होतील की नाही, याबाबत अनिश्चितता असली तरी दोन भावांची भेट दसऱ्याच्या निमित्ताने होण्याची शक्यता संजय राऊत यांनी सूचित केली आहे. मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे यांच्यावर सोडण्यात आला आहे.

याशिवाय, दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून मनसेसोबतच्या युतीबाबत संकेत देतात का? याकडे सर्वांचे लक्ष असेल. या राजकीय चर्चेतून युतीचा मुहूर्त साधला जाईल का? की फक्त कौटुंबिक भेटींवरच ठाकरे बंधू एकत्र दिसतील, हे दसऱ्यादिवशी स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!