Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीचं मिळाली मोठी भेट! महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीचं मिळाली मोठी भेट! महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला

DA Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांनी वाढवून 58 टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलेला हा दिलासा महत्त्वाचा ठरत आहे. हा वाढलेला भत्ता 1 जुलै 2025 पासून लागू होईल. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळणार आहे.

याआधीची वाढ

सरकारने यापूर्वी 1 जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये 2 टक्के वाढ केली होती. त्या निर्णयामुळे सुमारे 1.15 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना फायदा झाला. त्यावेळी DA 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला होता.

हेही वाचा – पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार आणि खासदार 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

कोणाला लाभ?

नवीन वाढ 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू होणार आहे. उदाहरणार्थ, ज्यांचा मूळ पगार 30,000 आहे, त्यांना दरमहा अतिरिक्त 900 मिळतील. तर 40,000 पगार असणाऱ्यांना अतिरिक्त 1,200 मिळणार आहेत. त्यामुळे तीन महिन्यांची थकबाकी मिळून 2,700 ते 3,600 इतका दिलासा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

ओडिशा सरकारचाही निर्णय

केंद्रीय सरकारसोबतच ओडिशा सरकारनेही सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कर्मचाऱ्यांसाठी दिलासा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अलीकडेच महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर PSU कर्मचाऱ्यांचा DA 53% वरून 55% इतका होणार असून तो 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. यामुळे केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर लाखो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!