Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं धक्कादायक कारण

फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं धक्कादायक कारण

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्हा पोलीस दल आणि आरोग्य विभागाला मोठा हादरा बसला आहे. आत्महत्येनंतर महिलेने आपल्या हातावरच आपल्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे लिहून ठेवल्याचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. या लिखाणात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर ‘पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला,’ असे लिहिले होते. या धक्कादायक खुलाशांनंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा –Beed Crime : बीडमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार; छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम

काही महिन्यांपासून सुरु होता वाद

सदर महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेत पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन, असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री डॉक्टरांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या हातावर लिहिलेल्या मजकुरामुळे प्रकरण आता आत्महत्येपुरते मर्यादित न राहता गुन्हेगारी चौकशीच्या दिशेने सरकले आहे. या आरोपांमुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. घटनेची अधिकृत माहिती मागवली आहे. मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर सुसाईड नोट किंवा इतर पुरावे सापडले असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. सर्व पुरावे गोळा करून तपास सखोल केला जाईल. पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या शंका तपासल्या जातील. या घटनेत जो दोषी आढळेल, त्याला निश्चितच शिक्षा होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. ही घटना केवळ फलटणपुरती मर्यादित न राहता संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पोलीस दलावर आणि आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!