मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार, गायक आहेत. त्यात सोनू निगम यांचेही नाव आग्रहाने घेतले जाते. सोन निगम यांच्या आवाजाला आणि गाण्यांना केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही प्रचंड चाहतावर्ग आहे. याच कारणामुळे त्यांनी १० एप्रिल २००४ रोजी पाकिस्तानात एक लाईव्ह कॉन्सर्ट सादर केला होता, परंतु तो कार्यक्रम त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आणि ते थोडक्यात बचावले.
पाकिस्तानातील कराची येथे सोनू निगम यांचा कार्यक्रम नियोजित होण्याच्या काही तास आधी, जवळच एका बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सोनू निगम थोडक्यात बचावले. पाकिस्तानी लोकांनी त्यांना मदत केली. त्या बॉम्बस्फोटाच्या वर्षपूर्तीच्या सुमारे १० दिवस आधी, सोनू निगम यांनी त्या भीषण दृश्याला पुन्हा उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एका पाकिस्तानी चाहत्याने पाठवलेला एक व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे, ज्यामध्ये ते बॉम्बस्फोटाच्या दृश्याबद्दल भाष्य केले.
कराचीमध्ये सोनू निगमच्या कॉन्सर्टच्या आधी, कार्यक्रमाच्या ठिकाणी एक स्फोट झाला. अनेक लोक जखमी झाले आणि काहींनी आपले प्राण गमावले. असे असूनही, कडक सुरक्षा व्यवस्थेत कॉन्सर्ट पार पडला आणि सोनू निगमने कार्यक्रम सादर केला. व्हिडिओमध्ये सोनू निगमची एक जुनी क्लिप देखील आहे, ज्यामध्ये तो बॉम्बस्फोटांवर चर्चा करताना दिसत आहे.


