मुंबई : मनोरंजन क्षेत्रात अभिनव कश्यपची सध्या चांगलीच चर्चा आहे. अभिनव कश्यपने दबंग स्टार सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता शाहरुख खानवरही निशाणा साधला आहे. अनुराग कश्यपचा भाऊ अभिनवने शाहरुख खानबद्दल विधान केले. ‘शाहरूख खानने भारत सोडून दुबईला जावे. कारण त्याच्या तिथल्या घराचे नाव ‘जन्नत’ आहे. शाहरुखला फक्त कसे घ्यायचे हे माहीत आहे’, असे म्हटले आहे.
अभिनव कश्यप याने अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्याने म्हटले की, ‘हा समुदाय फक्त कसा घ्यायचा हे जाणतो, देणे नाही. ते फक्त घेतात. दुबईतील शाहरुख खानच्या घराचे नाव जन्नत आहे, तर येथील त्याच्या घराचे नाव मन्नत आहे. याचा अर्थ काय? तुमच्या सर्व इच्छा येथे पूर्ण होतात. तो अधिक आशीर्वाद मागत राहतो. मी ऐकले आहे की, तो त्याच्या बंगल्याला आणखी दोन मजले बांधत आहे. म्हणूनच मागण्या वाढत आहेत. जर त्याचे स्वर्ग तिथे असेल तर तिथेच राहा. तुम्ही भारतात काय करत आहात?’ अभिनवच्या या वक्तव्यामुळे शाहरुख खानचे चाहते संतापले आहेत.
शाहरुख खानबाबत अभिनव पुढे म्हणाला, त्यांनी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आपले राजवाडे, आलिशान बंगले बांधले आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती आहे याने मला काय फरक पडतो? तुम्ही मला खायला देता का? शाहरुख चांगला बोलणारा असू शकतो, पण त्याचे हेतूही भ्रष्ट आहेत. यापूर्वी सलमान खानवरही त्याने गंभीर आरोप केले होते.


