महाराष्ट्र जागरण डेस्क: अक्षय कुमारही प्रियदर्शनच्या सहकार्याने एक हॉरर कॉमेडी घेऊन येत आहे. ‘भूत बंगला’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ज्याची रिलीज डेट अक्षय कुमारने जाहीर केली आहे. स्त्री २ आणि भूलभुलैया ३ च्या यशानंतर, चाहत्यांना हॉरर कॉमेडी चित्रपट आवडतात, हे निश्चित झाले आहे. अशातच अक्षय कुमार ‘भुलभुलैया ‘नंतर आणखी एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. भीती आणि हास्याचा दुहेरी डोस विलक्षण असेल, असा दावा केला जात आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली आहे. ज्यामध्ये तो कंदील हातात धरलेला दिसत आहे.
अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, आज आम्ही हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’चे शूटिंग सुरू करत आहोत, त्यामुळे माझ्या आवडत्या प्रियदर्शनसोबत सेटवर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तुमच्यासाठी भीती आणि हास्याचा हा दुहेरी डोस २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स ! निर्मित प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ या चित्रपटाची निर्मिती फराह शेख आणि वेदांत विकास बाली यांनी केली आहे.
चित्रपटाची कथा आकाश कौशिक यांनी लिहिली आहे. ‘भूत बंगला’ २ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे. प्रियदर्शनने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यात लिहिले होते, १४ वर्षांनंतर, मी माझा जुना मित्र अक्षय कुमारसोबत एका हॉरर-कॉमेडी चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी पहिल्यांदा एकता कपूरसोबत काम करत आहे. अक्षय कुमारने ‘भुलभुलैया’मध्ये काम केले आहे.


