मुंबई : बिग बॉस हा शो चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारी बिग बॉस १९ मध्ये खूपच निराश झाला आहे. सलमान खान दर आठवड्याला मृदुलला गेममध्ये अॅक्टिव्ह राहण्याचा आणि समस्यांवर आवाज उठवण्याचे म्हणताना दिसत आहे.
मृदुल तिवारीवर सलमान खान संतापल्याचे पाहिला मिळाले. बिग बॉसच्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. प्रोमोमध्ये सलमान खान यूट्यूबर मृदुलला फटकारताना दिसत आहे. तान्या मित्तल मृदुलला त्याचा खेळ कसा सुधारायचा हे समजावून सांगताना दिसली, कारण शो संपायला सुमारे ४० दिवस शिल्लक होते. तान्याचा मुद्दा समजून घेण्याऐवजी, मृदुलने घरातील सदस्यांना सांगितले की, ती फक्त त्यांना कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
मृदुलने इतर घरातील सदस्यांना असेही सांगितले की, तान्या सर्वांबद्दल वाईट बोलत आहे. मृदुलचे म्हणणे ऐकून संपूर्ण घर तान्याविरुद्ध उठले. तान्याला बाजूला करण्यात आले. तान्याने घरातील सदस्यांना दिलेले स्पष्टीकरण चुकीचे मांडल्याबद्दल सलमानने मृदुलला फटकारले.
रागाच्या भरात सलमानने मृदुलला विचारले, ‘तुला खेळ समजतोय की नाही? तान्याने ते तुझ्या भल्यासाठी समजावून सांगितले. पण मृदुलने सर्वांना स्वतःची कहाणी सांगितली, म्हणूनच तू सर्वांनी तान्याला बाजूला केले’, असे म्हटले.


