Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शाहरुख खान करणार फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट; फॅन्सला लागली उत्सुकता…

शाहरुख खान करणार फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट; फॅन्सला लागली उत्सुकता…

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरूख खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट करणार आहे. 70 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स ११ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण ऐतिहासिक असणार आहे, शाहरुख खान स्टेजवर असणार आहे. फॅन्सला आता उत्सुकता लागली आहे.

शाहरुख खान फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. याबाबत शाहरूख खान म्हणाला, मी गेल्या काही वर्षांत माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि चाहत्यांसोबत असंख्य आठवणी शेअर केल्या आहेत. हा प्रेम, सिनेमा आणि जादूचा प्रवास आहे. ७० व्या वर्षी सह-होस्ट म्हणून परतणे खरोखरच खास आहे. आपण ही एक मेमोरेबल नाईट बनवू. ही नाईट हास्य, आठवणी आणि आपल्या सर्वांना आवडणाऱ्या चित्रपटांच्या उत्सवाने भरलेली असेल.

करण जोहर आणि मनीष पॉल शाहरुख खानसोबत फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करतील. होस्ट होण्याबद्दल करण जोहर म्हणाला, ‘फिल्मफेअर हा केवळ एक पुरस्कार नाही; तो एक वारसा आहे ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या कथेला आकार दिला आहे. २००० पासून, मी जवळजवळ प्रत्येक फिल्मफेअर पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिलो आहे आणि अनेकांचे आयोजन केले आहे. आपण ७० गौरवशाली वर्षे साजरी करत असताना, को-होस्टिंग करण्यास मला खरोखर आनंद होत आहे. या वर्षीचा कार्यक्रम सर्वात मेमोरेबल असेल’.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!