Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? ‘धकधक गर्ल’ने मुलाखतीत केला मोठा खुलासा

माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? ‘धकधक गर्ल’ने मुलाखतीत केला मोठा खुलासा

Madhuri Political Entry Rumors: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून अवघ्या जगभरात चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण तिचा अभिनय नव्हे, तर तिचा कथित राजकीय प्रवेश. ‘मिसेस देशपांडे’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी जगतात पदार्पणासाठी सज्ज असलेली माधुरी, प्रोफेशनल लाइफसोबत आता वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात माधुरी दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना याच अफवांना उधाण आले होते. त्या वेळीही या बातम्या फक्त चर्चांपुरत्याच मर्यादित राहिल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घोषणा झाल्या तशी पुन्हा माधुरीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगू लागली. मात्र, आता स्वतः माधुरीनेच या सर्व अफवांवर पडदा टाकला आहे.

हेही वाचा – समांथा प्रभू पुन्हा बोहल्यावर! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. कोणताही राजकीय मार्ग स्वीकारण्याचा तिचा विचार नसल्याचे तिने ठामपणे सांगितले. माधुरी म्हणाली, ‘मला स्वतःलाही याबद्दल खात्री नाही… पण माझ्या मते राजकारण माझा मार्ग नाही. एक कलाकार म्हणून समाजात जागरूकता निर्माण करणं, माझे विचार मांडणं, आणि शक्य तितक्या लोकांना मदत करणं हेच माझं ध्येय आहे.’

पुढे ती म्हणाली, राजकारणात जाणं कधीच माझं लक्ष्य नव्हतं. मी स्वतःला त्या जागी ठेऊ शकत नाही. एक अभिनेत्री म्हणून मी जे करू शकते ते मला राजकारणापेक्षा खूप अधिक अर्थपूर्ण वाटतं. माधुरीच्या या वक्तव्यामुळे तिच्या नावावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तिच्या चाहत्यांसाठी मात्र ही मोठी दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!