Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

केंद्राचा ऐतिहासिक निर्णय! पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार कार्यालय

केंद्राचा ऐतिहासिक निर्णय! पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार कार्यालय

PMO Office Name Change: केंद्र सरकारने देशातील महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या नावांमध्ये मोठा बदल करत पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव आता ‘सेवा तीर्थ’ असे ठेवले आहे. तसेच देशभरातील सर्व राजभवनांची नावे बदलून त्यांना ‘लोक भवन’ असे संबोधले जाणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार हा बदल केवळ प्रशासकीय नसून सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे असा परिवर्तनाचा प्रवाह सुरू आहे. साउथ ब्लॉकमध्ये गेली 78 वर्षे असलेले पंतप्रधान कार्यालय आता ‘सेवा तीर्थ’ नावाच्या नवीन अत्याधुनिक कॅम्पसमध्ये स्थलांतरित होत आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग मानला जातो.

हेही वाचा –‘संसद नाटकाचे व्यासपीठ नाही’; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

सरकारने यापूर्वीही महत्त्वाच्या स्थळांची नावे बदलली आहेत. राजपथचे नाव ‘कर्तव्य पथ’ असे बदलण्यात आले, ज्यामागील संदेश सत्ता ही विशेषाधिकार नसून एक कर्तव्य आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव ‘रेसकोर्स रोड’ वरून ‘लोक कल्याण मार्ग’ असे करण्यात आले. हे नाव जनकल्याणाची भावना अधोरेखित करते.

अधिकाऱ्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रशासनाला कर्तव्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांवर आधारित करण्यासाठी अनेक रचनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उभारलेले नवीन केंद्रीय सचिवालय आता ‘कर्तव्य भवन’ म्हणून ओळखले जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!