Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

Devendra Fadnavis Letter To Amit Shah: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या भीषण विमान अपघाताचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक विशेष लेखी पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची अधिकृत विनंती केली आहे. या पत्रात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि मुद्द्यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला असून, राज्याच्या राजकारणात या पावलामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

तपासासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार आणि ६ मार्चचे पत्र
अजित पवार यांच्या अपघाताबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आणि शंका उपस्थित केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पाऊल उचलत 6 मार्च 2026 रोजीच केंद्राला पत्र लिहून सखोल तपासाची मागणी केली होती. विशेष म्हणजे, आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी राज्य सरकारवर तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला होता; मात्र मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रासोबत रोहित पवारांचे निवेदनही जोडले आहे, ज्यामुळे विरोधकांच्या आरोपांतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

नेमकी दुर्घटना काय होती?
ही हृदयद्रावक घटना बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर घडली होती. मुंबईहून बारामतीला येत असताना, विमान उतरवत असताना वैमानिकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि विमान वेगाने जमिनीवर आदळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, एका दिग्गज नेतृत्वाच्या अशा जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवारांसारख्या कद्दावर नेत्याचा असा अपघाती मृत्यू केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की यामागे काही वेगळे कारण दडले आहे, हे शोधण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी सातत्याने होत होती. आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळे या प्रकरणाचे चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात गेले आहेत. या उच्चस्तरीय चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रलंबित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल, अशी भावना सामान्य जनतेत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!