Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Toll Refund Demand : ‘लोकांचे पैसे परत करा…’; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 32 तास ठप्प राहिल्याने राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Toll Refund Demand : ‘लोकांचे पैसे परत करा…’; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 32 तास ठप्प राहिल्याने राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Toll Refund Demand : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका रसायनाच्या टँकरमुळे झालेल्या अपघाताने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला. तब्बल ३२ तास महामार्ग ठप्प राहिल्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ज्या प्रवाशांनी हाल सोसले, त्यांचा टोल सरकारने तात्काळ परत करावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ज्वलनशील रसायनाचा टँकर उलटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला ३२ तास लागले. मैलोन्मैल वाहनांच्या रांगा, तहानलेली लहान मुले आणि खाण्यापिण्याच्या सोयीअभावी प्रवाशांचे अक्षरशः बेहाल झाले. इतका मोठा मार्ग ३२ तास बंद राहतो, याचा अर्थ प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापनाचा कोणताही ठोस ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ नाही, अशी टीका आता होत आहे.

हेही वाचा – Traffic Jam : पुणे-मुंबईनंतर आता ‘या’ हायवेवर कोंडी; किनी टोलनाक्याजवळ कांद्याचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला काही बोचरे प्रश्न विचारले आहेत. टोल घेता मग सुविधा कुठे आहेत? मूलभूत सोयी न देता केवळ वसुली करणे हे सरकारचे काम आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या प्रवाशांना ३२ तास रस्त्यावर अडकून पडावे लागले, त्यांच्याकडून या काळात वसूल केलेला टोल सरकारने सन्मानाने परत करावा, असे त्यांनी स्पष्टपणे सुचवले आहे.

हायस्पीड ट्रेनच्या गप्पा आणि वास्तव
अर्थसंकल्पात हायस्पीड ट्रेनच्या घोषणा होत असल्या तरी, सध्याचा मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करण्यात सरकारला अपयश आल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मुंबई आणि पुणे ही देशाच्या विकासाची इंजिनं आहेत, मग ३२ तास ही दोन शहरे एकमेकांपासून तुटलेली असताना सरकार फक्त चौकशीचे आदेश देऊन गप्प कसे बसू शकते?’ असा शब्दांत राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!