HSC Exam 2026: महाराष्ट्र राज्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Exam) परीक्षा मंगळवारपासून (दि. १०) सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने ‘कॉपीमुक्त’ परीक्षा घडवण्याचा दावा केला असला, तरी पहिल्याच दिवशी वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, तर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात एकही गैरप्रकार आढळले नाही. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला. वाशिम विभागात एकूण २० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
या वर्षी अकोल्यातून २७ हजार ०३५, अमरावतीतून ३५ हजार ९२९, बुलढाण्यातून ३६ हजार ३६४,यवतमाळातून ३५ हजार ५७० आणि वाशिममधून २२ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला हजेरी लावली. बुलढाण्यात किमान ८ अनियंत्रित केंद्रे आणि अमरावतीत सर्वाधिक ३४ अनियंत्रित केंद्रे असल्याने प्रशासनाने सुमारे ८५ टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर उर्वरित १५ टक्के केंद्रांवर कड़क उपाययोजना राबविण्यात आल्या. अमरावतीतील १३७ परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
१३७ केंद्रांवर परीक्षा शांततेत
धारणी व चिखलदरा तालुक्यातील संवेदनशील केंद्रांवर आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मेळघाटातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा आणि विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा उपलब्ध ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परीक्षेत कॉपी अथवा गैरप्रकार आढळल्यास ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रक्टिस अॅक्ट १९८२’ अंतर्गत तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३४, १८८ व १२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला.
याशिवाय परीक्षा केंद्रात बसून नऊ सहाय्यक पथ-रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय केंद्राच्या संकुलातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भरारी पथ स्वतः मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना भेट देत असून दक्षता समितीची भरारी पथकेही कोणतीही पूर्व सुचना न देता आक्सिमतपणे परीक्षा केंद्राना भेटी देणार आहे. ज्या केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ते पुढील वर्षापासून बंद केले जातील. नाशिक विभागात २८५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि २६२ केंद्रीय सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिक्षण, कस्टम, जिल्हा परिषद यांच्याशी संलग्न विभाग कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागात एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळला नाही. जळगाव विभागातील पाचोरा येथे चार विद्यार्थी कॉपी करताना आढळले. दुसरीकडे, परीक्षेच्या सुरुवातीला आणि परीक्षा संपल्यानंतर, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळातच दुसऱ्या सत्रात शाळा आणि महाविद्यालये भरल्याने वाहतुक कोंडीत भर पडली.


