खराबवाडी (पुणे): चाकण एमआयडीसी परिसरातील गावांमध्ये सकाळी धुक्याची चादर पसरलेले चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून थंडी वाढली असल्याचे अनुभवायला मिळत आहे. थंडीचा पारा हा १५ ते २० अंशाच्या दरम्यान आला आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी पारंपरिक कान टोपी, शाल, स्वेटर, जर्किन, स्कार्फ आदी ऊबदार कपड्याचा वापर नागरिक करु लागले आहेत. तसेच नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवत असल्याचे चित्र गावांमध्ये दिसून येत आहे. सकाळी उशिरापर्यंत धुके पसरले असल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. पहाटे स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.


