Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune suicide: पुण्यात पुन्हा ‘वैष्णवी’ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल

Pune suicide: पुण्यात पुन्हा ‘वैष्णवी’ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल

Pune suicide: जिल्ह्यात पुन्हा एकदा विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात तरुणीने आपलं जीवन संपवलं. त्यामुळे, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आणखी एका वैष्णवीने स्वत:ला संपवल्याची भावना परिसरात निर्माण झाली आहे. पुण्यातील लोणीकंद परिसरातील ही घटना असून वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या विवाहीत तरुणीचे नाव आहे.

सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्यानेच तरुणीने राहत्या घरातच जीवन संपवलं, घरातच ओढणीने गळफास घेत केली आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या आत्महत्याप्रकरणामुळे पु्न्हा एकदा पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यूप्रकरण राज्यभरात चर्चेत आलं होतं. वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. पण, त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंसह हगवणे कुटुंबातील संबंधितांना अटक केली होती. या घटनेनं, पुन्हा एकदा हुंडाबळीचा विषय राज्यभर चर्चेत आला होता. मात्र, 2026 मध्येही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या घटना समोर घडत असल्याने पुरोगामी महाराष्ट्रात राज्य सरकार आणि पोलिसांपुढे हे मोठं आव्हान आहे.

हेही वाचा- वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंद आणि निलेश चव्हाणचा जामीन अर्ज फेटाळला

हुंडाबळी कायदा 1961 मध्ये
भारतात 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरुपातील देवाण घेवाण करणं गुन्हा आहे. पण, अजूनही समाजात हुंडा घेणं, त्यासाठी होणारा छळ, प्रसंगी महिलांचे जाणारे बळी या गोष्टी अजूनही का थांबले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!