Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

झोपी गेलेल्या भाजपा नेत्या जाग्या झाल्या अन पाण्यावर बोलू लागल्या : थिटेवाडीत मोठ्या पाणी योजना राष्ट्रवादीमुळेच

झोपी गेलेल्या भाजपा नेत्या जाग्या झाल्या अन पाण्यावर बोलू लागल्या : थिटेवाडीत मोठ्या पाणी योजना राष्ट्रवादीमुळेच

पाबळ: कितीतरी दिवस शिरुरच्या राजकारणापासून दूर राहून घरी झोपून राहिलेल्या भाजपाच्या नेत्या आणि काही नेते आत्ता जागे झाले आणि पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील निवडणूकीमध्ये पाण्यावर बोलू लागलेत. या गटातील कुठल्याच प्रश्नांबाबत भाजपाला काहीही आणि कधीच काही पडलेले नसल्याचा इतिहास आहे. थिटेवाडी बंधारा आंदोलन, १२ गावे पाणी आंदोलने, मुंबईतील मंत्रालयातील बैठका आणि महत्वकांक्षी पाबळ-केंदूर पाणी योजना. याबद्दल सध्या अचानक झोपेतून जाग्या झालेल्या भाजपा नेत्या आणि काही नेते यांना काहीही पडलेले नसून त्यांचे ध्येय फक्त निवडणूकीत हिवरे येथील दोन उमेदवारांचे बळी द्यायचे आहेत एवढेच असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे.

भाजपाला दूसरे गाव पण सापडेना !

पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे अजुनही कायम आहेत. या गटात राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच आघाडी घेवून जिल्हा आपले तिनही उमेदवार निश्चित केले. यात गटासाठी प्रफुल्ल शिवले तर पाबळ गणासाठी वंदना पवार तर केंदूर गणासाठी सुचेता थिटे. या तिनही उमेदवारांची प्रचार सुरुवात मोठी जंगी झालेली आहे. भाजपा मात्र उमेदवार शोधार्थ बाहेर पडून हिवरे या एकाच गावात दोन उमेदवार देवून निश्चिंत झाली आहे.

हेही वाचा – पाबळ-केंदूर गटात परस्परमं समर्पयामी…! RSSच्या ‘सोनवणे-साकोरें’चा बळी अन् आयातांवर लावली जुगार

पाणीप्रश्नावर भाजपा कुठे आहे दाखवा अन बक्षीस मिळवा !

विकासनाना गायकवाड व दिपक खैरे या दोघांना भरीस घालून या निवडणूकीत भाजपाच्या काही नेत्यांनी एकाच गावातून उतरविले असून पाबळ, केंदूर अशी मोठी गावात भाजपाला शोधूनही उमेदवार सापडलेले नाहीत. पाबळ-केंदूर च्या पाणीप्रश्नासाठी थिटेवाडी बंधारा आंदोलन या भागासाठी सर्वश्रुत आहे. हे आंदोलन केले ते राष्ट्रवादीच्या नेते-कार्यकर्त्यांनी. जेष्ठ नेते शरद पवार, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांनी या कामी पुढाकार घेतल्याने सन २००४ मध्ये थिटेवाडी बंधारा काम पूर्ण झाले. तेंव्हापासून तर आजपर्यंत या भागात पाण्यासाठीच्या आंदोलनात भाजपा कुठे होती हा प्रश्न या नेत्यांना सतावत आहे. जेंव्हा जेंव्हा पाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यात यांना कुठेही यश आले नसल्याने या गटात पाणी प्रश्नावर भाजपा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी टिंगलही सोशल मिडीयात सुरू आहे.

मोठ्या गावांना डावलून पलांडेंचा हिव-याचा आग्रह भाजपासाठी धोकेदायक !

पाबळ, केंदूर, करंदी, जातेगाव बुद्रुक, मुखई ही या गटातील मोठी गावे. मात्र या गावांना डावलून पलांडे यांनी हिवरे या अगदी छोट्या गावातील दोन उमेदवार निवडणे अगदी विचित्र निर्णय असल्याचे भाजपातील नाराजांचे म्हणणे आहे. त्यांनी स्वत: उभे रहायचे सोडून त्यांनी राष्ट्रवादीतील दोन माजी सरपंच पळवून त्यांच्या गळ्यात उमेदवारी घालणे हे अत्यंत वाईट असून संघ आणि भाजपा विचारधारा नसलेल्यांना उमेदवारी आणि संघविचार जपून वाजेवाडीसारख्या गावचा विकास करुन दाखविलेल्या अमित सोनवणेंवर अन्याय म्हणजे भाजपाला मानणा-या कार्यकर्ते-पदाधिका-यांसाठी खुप वाईट मेसेज गेला असल्याचे सोनवणे यांच्या समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!