Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?

शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?

Salil Deshmukh Resigns: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. शिंदे गट आणि भाजपात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे आधीच वातावरण तापले असताना, आता शरद पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी पवार गटातील सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सलिल देशमुख यांनी आपला राजीनामा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना थेट पाठवला असून, त्यांच्या या निर्णयाने राजकीय चर्चांना जोर आला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू असताना त्यांचा राजीनामा अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे.

प्रकृती बिघडल्याचा दाखला

राजीनामा देताना सलिल देशमुख यांनी आरोग्य बिघडल्याचे मुख्य कारण पुढे केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही महिन्यांसाठी विश्रांतीची गरज असल्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर जात असल्याचे त्यांनी सांगितले. उद्याची परिस्थिती काय असेल ते सांगता येत नाही, मात्र सध्या मी प्रकृतीमुळे बाजूला होत आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. ते दुसऱ्या पक्षात जाणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणताही ठाम खुलासा टाळला.

हेही वाचा –‘अगोदर माझे कार्यकर्ते संपवले, आता मलाच संपवण्याचा डाव…’; प्रदीप गारटकर यांचा दत्तात्रय भरणे यांच्यावर घणाघात

20 वर्षांची सक्रिय राजकीय कारकीर्द

सलिल देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते मागील 20-22 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सक्रिय होते. नागपुर तसेच विदर्भ प्रदेशात युवक संघटनांमध्ये काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना अनेक विकासकामे आणि प्रकल्प राबवण्यात त्यांनी योगदान दिल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात खास म्हटले आहे. मात्र, आरोग्याच्या अडचणींमुळे पुढील सहा महिने कोणतेही राजकीय काम करणे शक्य नसल्याने त्यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. प्रकृती सुधरल्यानंतर पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकीकडे शिंदे गट आणि भाजपात प्रवेशांची लगबग सुरू असताना, दुसरीकडे पवार गटातील हा राजीनामा अनेक तर्क-वितर्कांना वाव देत आहे. नेमका हा निर्णय फक्त आरोग्यापुरता मर्यादित आहे की यामागे काही वेगळे कारण दडलंय? यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!